Ideal weight– सत्य की अंधश्रद्धा😊??

 

आपण आणि आपलं मुल ही आपली खासगी बाब आहे.  साहजिकच जर न विचारताच कुणी त्यासाठी फुकटात सल्ला देत असेल तर वैताग येतो! आपल्या भारतीय समाजात तर लग्न झाले की लगेच सर्वानाच मुलाची घाई होते. त्यातुन मुलासाठी थोडा उशीर होत असेल तर मग विचारायलाच नको! तुमचं वजन, तुमची life style वगैरे सर्व बाबतीत सल्ले चालू होतात! 

तुम्ही थोडे slim प्रकारातले असाल, health conscious असाल, diet करत असाल तर ते कसं चूकीचे आहे हे सांगितले जाते. आणि तुम्ही थोडे स्थूल वर्गात मोडत असाल तर ते कसे चुकीचे आहे ते! 

व्यायाम करू का नको, कुठला व्यायाम करू, सर्व खाऊ का नको, कुठला diet चांगला, किती वजन असावे असे खुप सारे प्रश्न तुम्हाला पडलेले असणार! 

खरच असं काही आदर्श वजन असतं का? 

वजन, BMI ( body mass index), आणि  कमरेचा घेर या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत! तुमचे वजन आणि तुमची ऊंची यावरून BMI काढता येतो. 20 ते 25 मध्ये BMI असेल तर तो नॉर्मल आहे. तो 25 ते 30 च्या मध्ये असेल तर तुम्ही overweight वर्गात येता, आणि 30 च्या वर obese. BMI 20 पेक्षा कमी असेल तर तो low BMI आहे. 

कमरेचा घेर स्त्री साठी 35 इंंचापेक्षा कमी हवा, आणि पुरुषासाठी 40 इंंचापेक्षा कमी हवा. एखाद्या व्यक्तीचे वजन जरी जास्त असले तरी BMI आणि कमरेचा घेर जर प्रमाणात असेल तर त्याला आपण नॉर्मलच मानतो.  वजन हा एकमेव मापदंड फारसा  उपयोगी नाही. कारण वजन हा muscle mass  आणि fat या दोन्ही गोष्टींचा एकत्रित परिणाम आहे.  Muscle mass जास्त असेल तर त्याचा काही प्रॉब्लेम् नाही. Fat चे प्रमाण जर का गरजेपेक्षा जास्त असेल अथवा fat चे शरीरातील distribution चुकीचे असेल, म्हणजे सारे fat कमरेच्या घेरात असेल तर त्याचा नक्की वाईट परिणाम होतो! त्यामुळे शरीराचा हॉर्मोन balance बिघडतो आणि मुल होण्यात अडचण येऊ शकते! 

दुसऱ्या शब्दात सांगायचे तर एखाद्या व्यक्तीचे वजन जरी कमी असले तरी जर BMI अथवा कमरेचा घेर प्रमाणाबाहेर असेल तर तिला किंवा त्याला मुल होण्यास वेळ लागू शकतो! 

तर फक्त वजनाचा विचार करू नका. तुमचा BMI आणि कमरेचा घेर तपासा , आणि त्यानुसार तुम्हाला काय करावे लागेल ते ठरवा! 

Having kids after marriage  is a personal matter for anyone. Naturally when people start giving unsolicited advise about these things you get annoyed! Particularly when people know that you are having some trouble in conceiving, there is no way to stop this. 

People will start advising about your diet, your weight, exercise routine, lifestyle etc. If you are slim , if you are health conscious, if you follow diet, then it will be impressed on you that these practices are wrong. If you are little fat then you will be told time and again that weight is the main problem. 

Is there really any ideal weight ? 

Weight, BMI ( body mass index) and abdominal circumference are  three different things. BMI is calculated from your height and weight. If it is between 20-25, it is considered as normal. BMI more than 25 to 30 is overweight and BMI more than 30 is obese. Abdominal circumference should be less than 35 inches in women and less than 40 inches in men. 

Weight has very little utility value if considered alone. Weight is made up of muscle mass as well as fat. Fat is the culprit. If someone is overweight due to more muscle mass then it is usually not a problem. Instead if fat is more or particularly if fat distribution is not correct then it can cause hormonal imbalance and infertility. 

In other words a person can have normal weight, but if his/her BMI and abdominal circumference are not within normal range then it can cause problem. 

So don’t rely only on weight! Measure BMI and abdominal circumference as well! 

https://www.facebook.com/pg/Dr-Manjushri-Kothekar-IVF-Specialist-Mumbai-583761878970344/community/