दिवाळी, नातेवाईक आणि Infertility!!!!

दिवाळी आली म्हटल की एक वेगळाच उत्साह संचारतो! घराची साफ़ सफ़ाई, नवीन खरेदी, नातेवाईकाच्या भेटी गाठी वगैरे वगैरे! 
आता भेटी गाठी झाल्या तर थोडे फार बोलणेही होणारच आणि अप्रिय प्रश्न विचारले जाणार  !  दिवाळीच नाही तर कुठल्याही सणा मध्ये हे अपेक्षितच असतं की! पण मग त्या प्रश्नांच्या भीती मुळे काय आपण आपल्या उत्साहाला मूरड घालायची? उलट या वेळेस या प्रश्नांना न घाबरता सामोरे ज़ाऊ!! 
सर्वात प्रथम हे लक्षात घ्या की आता तुम्हाला मुल होण्यासाठी अडचण येते आहे यात तुम्हाला guilty किंवा अपराधी वाटण्या सारखे काहीही नाही. इतर कुठल्याही आजारा सारखा हा देखील एक आजार आहे.  त्यामागे शास्त्रीय कारणे आहेत. तुमची lifestyle, तुम्ही काय खाता, किती वेळ नोकरी करता, किती वेळेस hoteling करता, किती swiggy करता वगैरे वगैरे गोष्टींचा याशी  काही काही संबंध नाही!  तुमचे वजन आणि BMI याचा थोडाफार आहे, पण ते Infertility चे एकमेव कारण कधीही नसते. 
तुम्हाला अप्रिय प्रश्नांची भीती का वाटते?  जर तुमच्या मनात ही अपराधी पणाची भावना असेल तर साहजिकच तुम्ही त्याला टाळायाचा प्रयत्न करणार! पण तुम्ही आयुष्य भर तर हे सर्व टाळू शकत नाही, बरोबर? 
Let’s confront it then! 
तुमचा उत्साह कमी करू नका. सर्व काही दणक्यात साजरे करा. नातेवाईकाना  भेटा, आणि कुणी विचारले की आता कधी baby प्लान् करताय, तर बिनधास्त उत्तर द्या. सांगा की प्रयत्न चालू आहेत किंवा Doctor ना भेंटतोय, treatment चालू आहे….. 
कुणी सांगेल की हे डाॅक्टर खुप चांगले आहेत, त्यांचा कुणाकुणाला गुण आला. कुणी म्हणेल हे व्रत करा, या बाबा कडे जा. कुणी तुमच्या hoteling वर बोट ठेवेल, कुणी lifestyle वर! या सर्वा मागे अर्थात त्यांचा आपल्याला मदत व्हावी हाच उद्देश असतो. तुम्ही शांतपणे ज्या गोष्टी पटतात त्या घेऊ शकता. ज्या पटत नाहीत त्या साठी सांगा की आमच्या डाॅक्टरानी मनाई केली आहे. पण या सगळ्याचा तुमच्या celebration वर परिणाम होऊ देऊ नका! 
 चला तर मग या दिवाळी साजरी करायला…. ! 
तळटीप : ब्लॉग च्या title वरून तुम्हाला कदाचित शंका येईल, पण याचा भा डी पा शी काही संबंध नाही! 😊
Diwali festival has a special place in our hearts. It is associated with so much of cleaning, painting homes, delicious snacks, fire crackers and what not! It also includes the ritual of meeting relatives.  Obviously when we meet people we will talk a lot, this may involve few questions which you don’t like. It is not only expected in Diwali, but other festivals as well. Just because you may be asked such uncomfortable questions, should you stop celebrating festivals?? 
Certainly not! Let’s decide to confront these questions courageously! 
First of all, you should not feel guilty for this. If you are encountering problems while conceiving, it is not your fault. It is a disease just like any other disease. There are scientific reasons behind it. Your lifestyle, work patterns, eating habits, dining out, swiggy etc etc is not linked to it. It may have some relation with your weight and BMI, but these things are never the primary reason of Infertility. 
Get yourself free from the shackles of this guilt complex and confront the uncomfortable questions.  There is no need to celebrate festivals with subdued enthusiasm.  Enjoy thoroughly! 
People may give suggestions like try this doctor or try this Baba. People may put blame on your lifestyle, your job etc etc. Understand  the context behind this. They are trying in a way to help you. You can take what you like and leave what you don’t like.  Don’t let it affect your mood! 
Lets start the celebration then! 
 Happy Diwali!! 
https://www.facebook.com/pg/Dr-Manjushri-Kothekar-IVF-Specialist-Mumbai-583761878970344/community/