Embryo Grading. ….. उडदामाजी काळे गोरे!!!

एकदा IVF Clinic ची पायरी चढली की, की eggs, embryos, implantation वगैरे शब्द कानवळणी पडतात! जसजशी तुमची treatment पुढे सरकते, तसे अजून किचकट शब्द, day 3 embryo, A grade अथवा B grade, blastocyst इत्यादी शब्द देखील ओळखीचे होतात! तुमचे success चे chances किती, किती embryos transfer करायचे वगैरे वगैरे गोष्टींच्या मुळाशी embryo grading चे discussion च असते!

तर हे Embryo grading म्हणजे नक्की काय?
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर कुठला embryo चांगला आणि कुठला कमी चांगला हे ठरवण्याची ही एक पद्धत आहे. Egg/अंडे आणि sperm/शुक्राणु यांच्या एकत्रिकरणातून embryo/गर्भ तयार होतो. या embryo ला lab मध्ये culture केले जाते, म्हणजे पुढे वाढू दिले जाते. Embryo च्या cells विभाजित होत जातात आणि Day 2 ला तो 4 cells आणि day 3 ला 6-8 cells चा होतो. त्याला अजून पुढे वाढू दिले तर day 4 ला विभाजित होणाऱ्या असंख्य cells चा पुंजका तयार होतो, ज्याला Morula असे नाव आहे. Day 5 ला तो पुढे विभाजित होतो आणि त्यात cells चे दोन प्रकार दिसायला लागतात. त्याच्या मध्याशी एक पोकळ जागा निर्माण होते. एका प्रकारच्या cells एकत्र येऊन Inner cell mass तयार करतात, आणि इतर cells पासून tropho ecto derm बनते. या Inner cell mass पासून पुढचा गर्भ बनतो आणि trophoectoderm पासून त्याचे आवरण!
Embryo transfer तिसरे दिवशी (Day 3) अथवा पाचवे दिवशी (Day 5) केले जाते. बनलेल्या embryos मधून सर्वात चांगले embryos निवडण्यासाठी grading वापरले जाते. Grading करताना embryos मध्ये एकूण किती cells आहेत, त्यांचे आकार/size एकसारखे आहेत का वेगवेगळे आहेत (asymmetrical), त्यात fragmentation( सोप्या शब्दात कचरा) किती प्रमाणात आहे, वाढीचा वेग कसा आहे या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या जातात. याप्रमाणे जे A अथवा B ग्रेड चे embryos आहेत ते आधी वापरले जातात.
कमी ग्रेड च्या embryos पासून यशस्वी गर्भधारणे ची शक्यता कमी असते. बहुतेक वेळा patients च्या मनात ही शंका असते की खराब प्रतिच्या embryos पासून गर्भधारणा झाली तर होणाऱ्या बाळामध्ये व्यंग्य निर्माण होईल. Embryo grading चा उपयोग success chances चा अंदाज लावण्यासाठी मुख्यतः केला जातो, बाळा मधील व्यंग्य ओळखण्यासाठी त्याचा फारसा फायदा नाही. सोप्या शब्दात समजवायचे झाले तर असे म्हणता येईल की कमी Grade चे Embryos गर्भपिशवीत सोडले तर यशस्वी गर्भधारणा होण्याची शक्यता चांगल्या grade च्या Embryos पेक्षा कमी राहील, पण या पेक्षा अधिक माहिती यातून मिळत नाही!
Grading काय आहे हे पाहिलं! आता तुमच्या मनात पुढचे प्रश्न तयार असतील….जसं की कमी grade चे Embryo बनन्यामागे काय कारण असतं? वगैरे वगैरे…. त्या बद्दल वाचा पुढच्या blog मध्ये !

Once you start visiting an IVF clinic, you get used to the words like embryo, implantation etc. As your treatment advances you also come to know about embryo grades, A or B, blastocyst etc…

What do we mean by Embryo grading?
Embryo grading is a technique which helps us to select good embryos from the lot , apart from the not so good embryos. An embryo is formed after the fusion of an egg and a sperm. The embryo cells keep on dividing and the embryo advances. On Day 2 the embryo has around 2 to 4 cells, while on Day 3 it has 6 to 8 cells. On Day 4 the embryonic cells form a compact mass of many cells which is called as Morula. On Day 5 a cavity is devloped within the embryo and it becomes a blastocyst. A blastocyst has two types of cells, one type forms the inner cell mass and another type forms trophoectoderm. The inner cell mass actually forms the fetus while the trophoectoderm forms membranes.
Embryo transfer may happen on Day 3 or Day 5. To select the best embryos from the available pool of embryos, grading is used. Embryos are graded taking into consideration various factors like cell number, symmetry, fragmentation percentage, rate of growth etc etc. Better grade Embryos have better chances of succesful outcome.
Many a times patients are doubtful if they conceive by less grade embryos, will it cause any congenital anomaly in the fetus? Embryo grades are helpful to gauge chances of succesful implantation, but apart from that one can not get any additional information.
Now you must have got a rough idea about Embryo grading, but you must be having further questions like what are the reasons of forming less grade embryos etc….
Read about it in my next blog post!