Frozen Embryo Transfer

जर तुम्ही IVF साठी अथवा कुठल्याही Infertility treatment साठी एखाद्या क्लिनिक मध्ये जात असाल तर Frozen Embryo transfer हा शब्द तुम्ही नक्कीच ऐकलेला असणार. त्यालाच FET असही म्हणतात (short form).
हल्ली मॉल्स मध्ये वगैरे बरेच frozen items विकायला असतात, जसं की frozen मटर, मोड आलेली मटकी, मुग, पराठे इत्यादी..
Frozen embryos किंवा गर्भ ही त्यातलीच एखादी भानगड आहे का असा तुम्हाला प्रश्न पडला असेल!
IVF च्या प्रोसेस मध्ये अनेकदा extra/surplus embryos (गर्भ) तयार होतात. हे सारे गर्भ जर आपण गर्भाशयात सोडले तर multiple pregnancy ( एक पेक्षा जास्त बाळे राहणे) ची शक्यता वाढते. चार अथवा पाच छोटी छोटी बाळे असे अनेक फोटो तुम्ही news paper मध्ये पाहिले असतील! न्यूज़ म्हणुन हा प्रकार कितीही सनसनीखेज वाटला तरीही प्रत्यक्षात अनुभवायला अवघड असतो. Multiple pregnancy मध्ये बहुतेक वेळा premature delivery होते, बाळा मध्ये व्यंग्य असन्याचे प्रमाण जास्त असते.
Embryo freezing च्या तंत्रांचा शोध लागल्यामुळे आपण आता असे surplus गर्भ freeze करू शकतो. पहिला प्रयत्न अयशस्वी झाला तर या frozen embryos मुळे patient ला परत पूर्ण treatment नाही करावी लागत. फक्त गर्भाशयाच्या आतील अस्तर (endometrial lining) वाढवण्यासाठी काही गोळ्या दिल्या जातात, आणि हे lining समाधानकारक दिसले की frozen गर्भाना thaw करून गर्भाशयात सोडले जाते.
FET चे दुसरे उदाहरण म्हणजे, IVF treatment करताना जर endometrial lining समाधानकारक रित्या वाढले नसेल तर अथवा patient ला ovarian hyperstimulation ची रिस्क असेल तर अशा वेळी बनलेले सर्व embryos /गर्भ हे freeze केले जातात, आणि त्यानंतरच्या महिन्यात गर्भाशयात सोडले जातात.
आजपर्यंत जगात लाखो बाळे या पद्धतीने जन्माला आलेली आहेत, आणि त्यांच्यामध्ये एकूण शारीरिक व्यंग्य अथवा pregnancy complication चे प्रमाण नैसर्गिक pregnancy पेक्षा वेगळे नाही.
ह्या freezing साठी vitrification ची पद्धत वापरली जाते आणि liquid nitrogen मध्ये -198°C तापमानाला त्यांना store केले जाते. आजपर्यंत अनेक अनुभवातून तावुन सुलाखुन ही पद्धत आजच्या स्टेज ला पोहोचली आहे. तर मॉल्स मध्ये मिळणाऱ्या शिळया frozen अन्न पदार्थांशी याची तुलना करू नका!
All the best!

If you are visiting a clinic for infertility, you must have heard about Frozen embryo transfer. It is also called as FET.
You might have seen frozen food packets in supermarkets and your mind may start comparing this frozen food with this process of frozen embryo transfer.
In the process of IVF many a times surplus embryos get formed, and if we transfer them all in the uterus there is a possibility of multiple pregnancy. You must have seen such photographs with 4 or 5 newborns under the caption of successful IVF in the newspapers. It may sound sensational in the news but when you actually experience you realise that it is a very difficult predicament. There are more chances of preterm birth and neonatal anomalies.
Using the technique of Embryo freezing these surplus embryos can be frozen and can be used later if the patient doesn’t conceive in first attempt. As the embryos are already formed, patient doesn’t have to undergo the whole process again. Her endometrial lining/wall of the uterus is prepared with some tablets and once it is devloped satisfactorily the frozen embryos are thawed and transferred.
Another example of using this technology would be in the case where there is a mismatch between egg growth and endometrial lining , also in cases where there is a risk of ovarian hyper stimulation. In such circumstances all the embryos are frozen and transferred in next cycle.
The technique of embryo freezing( also called as vitrification) has evolved over a long period. It is used widely world over and caused births of millions of babies without any added side effects.
The vitrification procedure involves freezing embryos at -198°C in liquid nitrogen. It is a highly skilled procedure and absolutely safe . Don’t compare it with the stale frozen food from supermarkets!
All the best!