प्रत्येक चांगल्या गोष्टीचे काही वाईट परिणाम असतात! Medicine ही त्याला अपवाद नाही. इथेही कुठल्याही उपचार पद्धतीचे, औषधीचे, प्रक्रियेचे देखील काही दुष्परिणाम असतातच! Ovarian Hyperstimuation किंवा OHSS हा त्यातलाच एक प्रकार!
IVF /टेस्ट ट्यूब बेबी च्या ट्रीटमेंट साठी तुम्हाला हार्मोनची injections देऊन तुमची अंडी वाढवली जातात. OHSS हा त्याचाच एक दुष्परिणाम आहे. तो का होतो ह्या मागची शास्त्रीय कारणे समजावने किचकट आहे, पण त्यामुळे तुम्हाला काय लक्षणे जाणवू शकतात त्या बद्दल मी इथे लिहित आहे.
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर OHSS मध्ये तुमच्या रक्त वाहिन्या/blood vessels जास्त सच्छिद्र/leaky बनतात, त्यामुळे त्यातील पाणी /fluid बाहेर पडून पोटात साचायला लागते . त्यामुळे पोट फुगणे, (bloating), जड़ वाटणे, पोटात दुखणे हे त्रास व्हायला लागतात. त्या सोबत उलट्या, मळमळ, पोट साफ न होणे ही लक्षणे देखील असतात. आजार वाढला तर dehydration, लघवीला कमी होणे, छातीत पाणी साचून दम लागणे, रक्ताच्या गाठी बनणे व त्यामुळे multi organ failure वगैरे त्रास होऊ शकतात.
साधारण पणे अति स्थूल अथवा अति कृष् स्त्रियां, PCOD असलेल्या स्त्रिया इत्यादिना असा त्रास होण्याची जास्त शक्यता असते.
जरी सर्व वेळा आपण याचा अंदाज लावू शकत नाही, तरीही तुमच्या सोनोग्राफी वरून आणि हार्मोन रिपोर्ट प्रमाणे तुम्हाला हा त्रास होईल का याची थोडिफार कल्पना येऊ शकते, व ते टाळण्यासाठी उपाय करता येतात. सर्वात महत्वाचा उपाय आहे तुमचे embryo transfer न करणे! म्हणजे तुमचे सर्व embryos फ्रीज केले जातात, आणि तुमच्या शरीरातील स्थिती normal झाल्या नंतर Frozen Embryo Transfer केले जाते.
नवनवीन संशोधनाचा वापर करून आता OHSS मुळे patient ला admit करण्याची गरज खूप कमी patient ना लागते!म्हणजे हजारात दोन वगैरे! पण तरीही हे टाळण्यासाठी patient आणि Doctor दोघांनाही जागरूक राहावे लागते!
Ovarian Hyperstimuation Syndrome/ OHSS
Every good thing also has some unwanted bad effects. Medicine is not an exception! Here also every treatment, procedure, drug has its own side effects! Ovarian hyper stimulation or OHSS is one of such side effects. Hormonal injections are used to stimulate the growth of ovarian follicles in the treatment of IVF. OHSS is one of the side effects of ovarian stimulation.
It is difficult to explain the detailed mechanism regarding how it happens. However you can read here about what symptoms are expected and how it can be treated .
Basically in OHSS the blood vessels become leaky. Hence there is loss of fluid from the blood vessels and the fluid gets accumulated in abdominal cavity. As a result the patient will have symptoms like abdominal fullness, bloating, nausea, vomiting, constipation etc. In severe cases there will be dehydration, reduced urine output, accumulation of fluid in pleural cavity, breathlessness , hyper coagubility of the blood etc leading ultimately to multi-organ failure and death.
Thin patients, patients with PCOS(poly cystic ovaries) etc are more prone to devlope OHSS. Though it is not possible to predict it in every case, one can get an idea depending upon the sonographic appearance and hormonal values. Measures can be taken to avoid severe OHSS in such cases.
One important measure is to avoid embryo transfer in the same cycle. All the embryos can be frozen and patient can undergo Frozen Embryo transfer at a later date.
Due to the advances in technology the overall incidence of admission for OHSS is quite low, in the range of 2 per thousand or so! Still both the patient as well as the Doctor have to be vigilant to avoid it!