Ectopic Pregnancy

तुमच्या कुण्या जवळच्या मैत्रिणीला अथवा नात्यातील कुणाला tube मध्ये प्रेग्नेंसी राहिल्या मुळे ओपरेशन करावे लागले असेल तर ectopic pregnancy हा शब्द तुमच्या परिचयाचा असेल! अथवा गूगल ला डॉक्टर मानुन विचारलेल्या एखाद्या प्रश्नावर आलेल्या उत्तरात असा शब्द तुम्ही वाचला असेल!
तर ह्या लेखातून मी तुम्हाला ectopic pregnancy ची ओळख करून देणार आहे.
नैसर्गिकरित्या जेव्हा गर्भधारणा होते, तेव्हा गर्भ fallopian tube/गर्भनलिके मध्ये तयार होतो. Egg /अंडे आणि sperm/शुक्राणु एकत्र येऊन गर्भ तयार होतो. हा गर्भ tube मधून प्रवास करून गर्भाशयात पोहोचतो आणि तिथे तो चिकटतो.
कधी काही कारणा मुळे tube चा आतील भाग खराब झाला असेल, अथवा चिकट झाला असेल तर गर्भाच्या प्रवासात अडथळे येतात आणि तो गर्भ tube मध्येच चिकटून जातो. असा गर्भ जर पुढे वाढत राहिला तर tube फुटुन जीवाला धोका होऊ शकतो.
कधी कधी गर्भ अंडाशयात चिकटतो. अथवा कधी पोटात इतरत्र कुठे! गर्भाची जी नैसर्गिक जागा आहे, ती सोडून कुठेही चिकटलेला गर्भ हा पूर्ण वाढू शकत नाही. अशा अनैसर्गिक ठिकाणी झालेल्या गर्भधारणेला ectopic pregnancy असे नाव आहे.
साधारणपणे याचे निदान सोनोग्राफी वर होते. जर लवकर निदान झाले तर medical ट्रीटमेंट करून याचा इलाज करता येतो. पण उशिरा निदान झाले तर operation शिवाय पर्याय नाही.
याच कारणासाठी पाळी चुकली की एका आठवड्यात डॉक्टर तुम्हाला सोनोग्राफी करायला सांगतात!
तुम्हाला जर कधी गर्भाषयाचा टीबी अथवा इतर कुठले इंफेक्शन झाले असेल तर तुम्हाला ectopic pregnancy ची रिस्क वाढते. Endometriosis च्या आजारात देखील ही रिस्क जास्त असते. कधी कुठले उघड कारण नसताना देखील unexplained कारणामुळे ectopic pregnancy राहू शकते. एकदा जर का ट्यूब मध्ये pregnancy राहिली असेल तर परत तसेच होण्याची शक्यता असते. त्यामुळे operation करताना जर दोन्ही tubes खराब दिसत असतील तर patient आणि relative शी चर्चा करून डॉक्टर दोन्ही tubes काढण्याचा अथवा delink/disconnect करण्याचा निर्णय घेतात. आणि असे केले तर pregnancy साठी IVF शिवाय दुसरा पर्याय उरत नाही. खूप क्वचित केस मध्ये IVF नंतर देखील ectopic pregnancy होऊ शकते. पण नैसर्गिक गर्भधारणे मध्ये ectopic pregnancy होण्याचे प्रमाण नेहमीच IVF pregnancy पेक्षा जास्त असते.
लवकर निदान करून वेळेत उपचार केले तर operation टाळता येऊ शकते.

Ectopic Pregnancy

You might have heard this term from a relative or a friend who had to undergo a surgery for tubal pregnancy. It is also possible that you encountered this term while googling on medicine and infertility.
Here I am going to explain you in detail about it.
Naturally when you conceive the embryo is formed by the fertilisation of egg with sperm. This happens inside the fallopian tube. The embryo then travels from the tube towards the uterus and it sticks to uterine wall. If, due to any reason, the tube has become sticky or abnormal from inside, then the embryo is not able to travel towards the uterus and it sticks inside the tube itself. Sometimes the embryo sticks to the ovary or some other location in the abdominal cavity. Such a pregnancy which has implanted outside the normal uterine cavity is called as ectopic pregnancy.
Such pregnancy can not grow like a normal pregnancy, and there is a risk of tubal rupture due to this. Diagnosis of ectopic pregnancy is mainly by ultra sonography. If diagnosed in time, it can be treated by medicines. However if the diagnosis is delayed then surgery will be required.
For this reason an early pregnancy scan which is done one week after missed periods is important.
If you had a history of genital tuberculosis or any other infection then you are more at risk of having ectopic pregnancy. History of endometriosis also makes you more prone for it. Sometimes there is no explainable obvious reason. If you had an ectopic in past then you are more prone for it again. That is why while doing the surgery if both the fallopian tubes are found to be damaged, the doctors discuss this with the patient and relative and remove or delink both the fallopian tubes. After this procedure the only option left for pregnancy is IVF.
Very rarely a patient can land up having ectopic pregnancy even after IVF, but the incidence is quite less than natural conception.
Early diagnosis can help to manage the condition with medicines and surgery can be avoided.